पोवई नाक्यावर जिल्हा बँकेच्या कर्मचारी वर्गमार्फत शरद पवार गटाचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वागताचे फ्लेक्स सातारा शहरात लावले आहेत मात्र जिल्हा बँकेच्या कर्मचारी वर्गाने पोवई नाक्यावरील शाखेच्या समोरील फ्लेक्स वर चक्क महायुतीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मदत पुनर्वसन मंत्री यांचे फोटो लावल्याने ये रिश्ता क्या कहलाता है असाच प्रश्न सातारकर यांच्या मनात येत आहे
लोकसभा विधानसभेला महायुतीच्या विरोधात सरळ लढत झाली होती याची जराशी ही कल्पना या कर्मचारी वर्गाला नाही का मुद्दामुन हा खोडसाळपणा केलाय अशी शक्यतेचि पाल मनात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चुकचुकत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे उद्या साताऱ्यात आगमन होत आहे त्यानिमित्ताने जिल्हा बँकेच्या कर्मचारी वर्गाने स्वागताचा फ्लेक्स कोणाच्या दबावा खाली?लावाय असाही अशी शंका लोकांच्या मनात कुजबूज करत आहे
जिल्हा बँक कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतेच जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड असताना जिल्हा बँकेच्या या कर्मचारी वर्गाने केलेल्या प्रतापाला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे… जिल्हा बँकेचे कर्मचारी आता राजकारणात सक्रिय झाले की काय असा प्रश्नही या फ्लेक्समुळे उपस्थित होत आहे