Thursday, June 4, 2026
spot_img
Home Satara District Karad आमदार घोरपडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

आमदार घोरपडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

105
Adv

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंब्रज मुले व मुली येथे शाळा प्रवेशोत्सवनिमित्त आमदार मनोज घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे हस्ते इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश मोफत व पाय मोजे यांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड खाऊचे वाटप करण्यात आले. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आपल्या मनोगतामध्ये दोन्ही शाळांच्या गुणवत्ता विकासाविषयी , उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा गौरव केला. या प्रसंगी बिपिन मोरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड, सर्जेराव केंजळे केंद्रप्रमुख केंद्र उंब्रज, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैताली शेजवळ, दिपक माने, उपसरपंच सुनंदा जाधव, सुनंदा पाटील माजी केंद्रप्रमुख, ग्राम पंचायत सदस्य, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Adv