पुण्यात मेट्रोचे जाळे आणखी घट्ट करण्यास राज्यस्थरावर अनेक हालचाली होत आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशत पुणे मेट्रोच्या अनेक नव्या मार्गांची घोषणा करण्यात आली. तसेच या कामासाठी भरीव निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.
पण पुणे मेट्रोचे ३ चे काम सप्टेंबर २०२५ ला पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. पण आता मेट्रो ३ ला सुरु होण्यास आता विलंब लागल्यामुळे यावर आयटी क्षेत्रातील मंडळी नाराजी व्यक्त केली आहे.
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, मेट्रो ३ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेला आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सुरूवातीला हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएने) अंतिम मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. हा मार्ग २३.३३ किमी लांबीचा एलिव्हेटेड आहे.