काय सांगता? वर्षात दोन वेळा टरबूजाचे पीक? चंद्रपूरच्या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी

237
Adv

टरबूज पीक उन्हाळ्यात एकदाच घेतले जाते. मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्याने वर्षातून दोनदा हे पीक घेत नफा मिळवला आणि प्रयोग यशस्वी करून दाखवला. प्रशांत शेजवळ नावाच्या युवा शेतकऱ्याने हे यश मिळवले आहे. चंद्रपूरपासून 20 किमीवर असलेल्या चिचपल्ली येथील तो रहिवासी आहे. त्याने गावालगत असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर शेतात टरबुजाची शेती केली.

मागीलवर्षी दोन एकरात त्याने हे पीक घेतले. त्याला पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले. एकरी एक लाख रुपयांचा नफा त्याने घेतला. त्यामुळे यावर्षी त्याने दहा एकरात ही शेती केली असून, यावेळीही उत्पन्न जोरात आहे.

उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक त्याने ‘ऑक्टोबर हिट’ मध्ये पण घेतले. तिथेही तो यशस्वी झाला. म्हणजे वर्षातून दोनदा तो टरबूजाचे उत्पन्न घेत आहे. आता त्याला सुमारे 25 टन एवढे उत्पादन होण्याची खात्री आहे.

Adv