सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस मोठया उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करण्यात येणार असून, वाढदिवसानिमित्त विविध संस्था, मित्रसमुह आणि विविध व्यक्तींच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविणेचे नियोजन पूर्ण झाले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस, सर्वसामान्य जनता एक उत्सव म्हणून साजरा करीत असते. शिवजन्मोत्सवापासून म्हणजेच दिनांक 19 पासून ते दि.24 पर्यंत सामाजिक उपक्रम आणि भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन उत्स्फुर्तपणे केले जाते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा संपूर्ण देशात विखुरलेला मित्रपरिवार देखिल आवर्जुन वाढदिवसानिमित्त एकत्र येत असतो. यंदाच्या वाढदिवसानिमित्त,शाहुकला मंदिर येथे राजमाता जिजाऊ एकपात्री प्रयोग, शाहुनगर येथे सागर भोसले मित्रसमुहाच्या वतीने होम मिनिस्टर, अन्नदान कार्यक्रम, प्रगतीशील शेतकरी पुरस्कार वितरण, एलईडी स्क्रीन शुभारंभ, असे कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच दि.23/02/2025 रोजी खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.23/02/202कार्यक्रमाचे नाव/ ठिकाण संयोजकाचे न महाआरोग्य शिबीर रक्तदान शिबीरमौजे नुने भैरवनाथ मंदिर, सातार श्री.अक्षय चांगणस.10 ते4नेत्र तपासणी व सातारा जिल्हयातील वीर पत्नी सन्मा मौजे चिंचेणर वंदन मारुती मंदिर, साताराश्री.राजेंद्र बर्गे पाटील स.10 ते4 आरोग्य शिबीर मतकर कॉलनी, प्रभाग क्रं ८ रवी माने मित्र समुह, सातारा९८५०५१८५०१स.10 ते 5आपली गोशाळा येथे देशी गाईना चारा,गुळ,खुराक वाटपआपली गोशाळा, पोलीस हेडक्वार्टर जवळ सातारा सुनिल तात्या काटकर मित्र समुह
अभिजि घोरपडे मित्र समुहदु.1 ते 6रिक्षा सौंदर्य स्पर्धा गांधी मैदान, सातारा अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघ सायं.7वा भव्य राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धा न्यु इंग्लिश स्कुल ग्राऊंड, कोंडवेअक्षय गुजर मित्र समुह
दिनांक 24/02/2025 रोजी सकाळी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांचे शुभाशिर्वांद आणि जलमंदिर पॅलेस स्थित श्री तुळजा भवानी देवीचे दर्शन घेवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अखंड महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेवण्याचे साकडं घालणार आहेत.
शिखर शिंगणापूर शंभु महादेव मंदिर येथे महाअभिषेक शिखर शिंगणापूर शंभू महादेव मंदिर निखील चव्हाण मित्र समूह, हत्तीखाना स.9 ते 1संगीत व नेत्र तपासणी कार्यक्रम एहसास मतिमंद मुलांची शाळा, मु.पो.वळसे ता.सातारा सौ.सुवर्णाताई पाटील श्री राजेंद्र बर्गे पाटीलस.9 ते 5 अपशिंगे मि.येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर अपशिंगे मि.श्री.तुषार निकम सरपंच स.10 ते 2
खाऊ वाटप जिल्हा परिषद शाळा चिंचणेर वंदन, सातारा श्री.राजेंद्र बर्गे पाटीलछत्रपती उदयनराजे मित्र समुह
स.10 वा शालेय साहित्य वाटप व खाऊवाटपजिल्हा परिषद शाळा, आंबेवाडीअक्षय पवार मित्र समुहस.10 ते नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपमतकर कॉलनी, प्रभाग क्रं ८ रवी माने मित्र समुह, सातारास.11वाखाऊवाटप जिल्हा परिषद शाळा, पाडळीसौ.स्वाती मोहनराव ढाणेसांय 11 वा.राणी लक्ष्मीबाई उद्यान उद्घाटननालनंद नगर बुधवार नाका श्री.किरण आवळे
दु.12 ते 1 महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना जेवनएहसास मतिमंद मुलांची शाळा, मु.पो.वळसे ता.सातारा सुनिल तात्या काटकरफिरोज मुलाणी सर बोरगांवदु.12.वाजता
अन्नदान कार्यक्रमसिव्हिल हॉ. सातारा नक्षत्र मार्फत
11दु.12 ते 2 अन्नदान माहेर संस्था कारंडवाडी सौ.सुवर्णाताई पाटील श्री राजेंद्र बर्गे पाटीलसायं.5 वा.महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना जेवनएहसास मतिमंद मुलांची शाळा, मु.पो.वळसे ता.साताराश्री.शरद इंगळेसायं.6वा. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, सुशोभिकरण कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, सातारा ॲड.विनीत पाटील
सायंकाळी 6.00 वाजल्या नंतर, रात्रौ 9.00 वाजेपर्यंत, जलमंदिर पॅलेस, सातारा येथील निवासस्थानी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत.
याशिवाय सातारा जिल्हयातील विविध गावांत आणि शहरातील प्रभागात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना त्या त्या भागातील नागरीक, उदयनराजेंवर प्रेम करणा-या व्यक्तींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हापरिषदेचे माजी सभापती आणि भाजपाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे संयोजक सुनील काटकर आणि सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले
आहे.
चौकट- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, हार,पुष्पगुच्छ, बुके कोणीही आणु नये अशी विनंती सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. बुके,पुष्पगुच्छ, हार-तुरे यांच्या ऐवजी उपयुक्त शालेय / शैक्षणिक साहीत्य (कंपास,वहया,पेन-पेन्सिल,चित्रकला वहया,इत्यादी )जलमंदिर पॅलेस येथील कार्यालयात जमा करुन , नोंद करावी जमा झालेले साहित्य गरजु आणि गरिब विदयार्थांपर्यंत पोहोचवून, त्यांना त्याचा लाभ मिळु शकेल.