यवतेश्वर घाटात रात्री 7 नंतर खुलेआम बार भरत असल्याचे चित्र पाहायला मिळते त्यामुळे पोलिसांच्याकार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.. तांबे साहेब अंमलबजावणी करा घाटात आपली pcr गाडी फिरत असती तर खुलेआम बार भरला नसता
साताऱ्यातील पान टपऱ्या, हॉटेल रात्री 11 नंतर उघड्या राहणे यावर पोलिसांचा अजिबात धाक नसून ऐतिहासिक सातारा शहराची दिवसेंदिवस बदनामीच होत चालली आहे यावरून स्पष्ट होते की साताऱ्यात पोलिसांचा धाकच राहिला नाही
माजी जिल्हा पोलीस प्रमुख के एम एम प्रसन्न यांची आठवण काढायची तरी किती वेळा अशी म्हणण्याची वेळ सातारकरांवर येऊन ठेपली आहे माजी जिल्हा पोलीस प्रमुख प्रसन्न साहेब यांनी कायदा काय असतो हाच दाखवून दिला होता के एम प्रसन्ना साहेब यांचा धाक गुन्हेगारांना चांगलाच बसला होता तसा धाक विद्यमान जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांचा बसत नसला असल्याचे स्पष्ट दिसत आहे
काही ठिकाणी पोलीसच स्वतःची सोय करण्यासाठी फ्री मध्ये रात्रीच्या पान टपऱ्या हॉटेल दुकानदारांकडून खाऊ खाताना दिसतात हे अतिशय लाजिरवाणी असून सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ पोलीस दादांना कळणार कधी अशी अपेक्षा सातारकर जनता करत आहे
एखादी घटना घडल्यावर सातारा पोलीस दल चार दिवस अंमलबजावणी करण्याची भूमिका बजावते पाचव्या दिवशी येरे माझ्या मागल्या अशीच मालिका सुरू असते साताऱ्यात रात्रीच्या वेळी गुन्हेगारी वाढण्याचे कारण म्हणजे रात्री 10 नंतर खुलेआम चालू असलेल्या पान टपऱ्या घाटात बसलेलीसन्माननीय नागरिक 11 नंतर सुरू असलेले हॉटेल साताऱ्यातील काही क्रीडां गणामध्ये चालू असलेला खुलेआम बार आता तरी पोलीस ॲक्शन मोडवर येणार का का पुन्हा छम छम चा आवाज ऐकण्यास उत्सुक राहणार अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे