
उद्योजक संग्राम बर्गे यांची चोरीला गेलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी शोधण्यात पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला यश.. इनोवा क्रिस्टा गाडी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात कायदेशीर प्रक्रियेनंतर गाडी ताब्यात मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले या कामगिरीबद्दल उद्योजक संग्राम बर्गे यांनी पुणे व सातारा पोलिसांचे अभिनंदन केले
परवा मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास संग्राम बर्गे यांच्या विलासपूर येथील राहत्या घरापासून येथून इनोवा क्रिस्टा गाडीची चोरी झाली होती चोरीच्या घटनेनंतर सातारा पोलिसांनी आपली तपासाची चक्रे अधिकच वेगाने फिरवली होती दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण हद्दीत अशाच इनोव्हा गाडींची चोरीची घटना घडली होती पुणे ग्रामीण पोलीस यांनी दोन दिवसापासून या आरोपींच्या मार्गावर शोध घेण्याचा प्रयत्न केला होता अखेर त्यांना यश आले असून पुण्यातील दोन इनोव्हा क्रिस्टा गाड्या व साताऱ्यातील उद्योजक संग्राम बर्गे यांची गाडी शोधण्यात पुणे पोलीस ग्रामीण यांना यश आले
कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर उद्योजक संग्राम बर्गे यांना गाडी ताब्यात मिळणार असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल उद्योजक संग्राम बर्गे यांनी पुणे पोलीस ग्रामीण व सातारा पोलीस दलाचे अभिनंदन केले