
नवनिर्वाचित आमदार महोदय यांच्यासमवेत खासदार छ उदयनराजे भोसले यांनी माउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरती भेट घेतली
भाजपचे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेतली भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले यावेळी नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले महेश शिंदे अतुल भोसले मनोज घोरपडे उपस्थित होते
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त करून छत्रपती उदयनराजेंनी गड अभेद ठेवला असे गौरवद्गागार देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीदरम्यान काढले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते