मतदारसंघातील जनतेसाठी मी कायम ‘रिचेबल’

213
Adv

काही लोक निवडणूक आली कि उगवतात. माझं तसं नाही. मी कायम मतदारसंघात असतो. मी साताऱ्यात राहतो. मी दररोज लोकांना भेटतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवतो. अचानक उगवलेला विरोधी उमेदवार निकालानंतर पुन्हा ‘नॉट रिचेबल’ होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, काहीही झालं तरी मतदारसंघातील जनतेसाठी मी २४ तास ‘रिचेबल’ आहे आणि कायम राहीन. लोकांच्या प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्यावर मला विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सातारा- जावली विधानसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी छ. शाहू चौक, कुंभारवाडा, पाटोळे चौक, शंभूराज देसाई बंगला, पोवई नाका, कासट मार्केट, शिकलगार वाडा, तहसील कचेरी, भाजीमंडई, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, वडार वस्ती, पंताचा गोट मैदान, प्रकाश लॉज, प्रिया व्हरायटीज ते शिक्षक बँक अशी पदयात्रा अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. .

Adv