
सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षातून अमित कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
मूळचे जावली तालुक्यातील असलेले अमित कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रवेश देऊन विधानसभेच्या निवडणुकीची मशाल हाती दिली आहे सातारा जावली मतदारसंघात ही लढत अटीतटीची होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे
राष्ट्रवादी पक्षाच्या ऐवजी शिवसेनेचा उमेदवार म्हणून अमित कदम यांना जावलीतील जनता स्वीकारणार का येणाऱ्या निवडणुकीत कळेलच मात्र महाविकास आघाडीने नवखा उमेदवार दिल्याने सातारा जावली विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की