शारदीय नवरात्र उत्सवाला साताऱ्यात प्रारंभ

593
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सातारा शहर व जिल्ह्यातील मंदिरात विधिवत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक उत्सव मंडळांनी देवींच्या मूर्तींची मिरवणुक काढून प्रतिष्ठापना ,केली. अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून पुढील नऊ दिवस शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवारी घटस्थापनेचा मुहूर्त असल्याने भाविकांची घटस्थापनेसाठी धांदल उडाली होती. घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

किल्ले प्रतापगडावर भवानी माता मंदिर, अजिंक्‍यताऱ्यावरील मंगळाई, यमाई (औंध), साखरगड निवासिनी (किन्हई), मांढरदेव येथील काळूबाई, देऊर येथील मुधाई, कण्हेर येथील वाघजाई, आसले येथील भवानी माता, पांडे येथील भैरवनाथ व वाईच्या महालक्ष्मी व व्यंकटेश मंदिरात,पाचगणीच्या घाटजाई,म्हसवड येथील सिद्धनाथ,यमाई,महालक्ष्मी,पालीच्या खंडोबा मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गामातेच्या जयघोषात मिरवणुका काढून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर, प्रतापगड अजिंक्‍यतारा, औंध आदी शक्तिस्थानावरून शक्तिज्योती प्रज्वलित करून आणल्या. कार्यकर्ते देवी जगदंबेचा जयजयकार करत होते. सायंकाळी उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात होती.

साताऱ्यातील मिरवणुकांना सकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी वातावरण दुमदुमत होते. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिरात पहिल्या दिवशी श्रीशैलपुत्री रूपातील तसेच विविध फुलांचा साज शृंगार केलेली दुर्गादेवीची पूजा बांधण्यात आली होती. सातारा कृष्णा नगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील श्री उमादेवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. मंदिरामध्ये पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम, होम, हवन, कुमारी पूजा, सुवासिनी पूजा तसेच दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरतनाट्यम गिटार वादन व गायन रास-दांडियाही रंगणार आदी कर्यक्रम कार्यक्रम सादर होणार आहेत.

Adv