स्वच्छ भारत अभियानामुळे सफाई मित्रांना आत्मसन्मानं

255
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

स्‍वच्‍छता ही प्रत्‍येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्‍येकाने कार्यरत राहिले पाहिजे. स्‍वच्‍छतेच्‍या उपक्रमांना चालना मिळावी, यासाठी स्‍वच्‍छ भारत अभियान राबविण्‍यात येत असून यामुळे सफाईमित्रांना आत्‍मसन्‍मान मिळाला आहे. आधुनिकीकरणामुळे दररोज वेगवेगळ्या कचऱ्याच्‍या प्रकारात वाढ होत आहे. या कचऱ्याचे संकलन, पुर्नप्रक्रिया करणारे ५ हजार स्‍टार्टअप गेल्‍या दहा वर्षांत उभे राहिले असून आगामी दहा वर्षांत या क्षेत्रात ६५ लाख नोकऱ्या उत्‍पन्न होतील, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिली.

अमृत २.० योजनेतून सातारा पालिकेच्‍या पाणीपुरवठा योजनेच्‍या स्‍वयंचलन प्रकल्‍पाची तसेच नळजोडण्‍यांना स्‍मार्ट मीटर बसविण्‍याच्‍या कामास नरेंद्र मोदी यांच्‍याहस्‍ते दिल्‍ली येथून दुरस्‍थ प्रणालीव्‍दारे सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. यासाठी पालिकेच्‍या सभागृहात विशेष प्रक्षेपण सुविधा उभारण्‍यात आली होती. यावेळी मुख्‍याधिकारी अभिजित बापट, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे, अभियंता अनंत प्रभुणे, दिलीप चिद्रे, सत्‍यकिर्ती पाटील तसेच इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

कामास सुरुवात केल्‍यांनतर नरेंद्र मोदी म्‍हणाले, स्‍वच्‍छता हि ठराविक वर्गाची जबाबदारी असल्‍याच्‍या गैरसमजातून स्‍वच्‍छ भारत अभियानाने नागरीकांना बाहेर काढले आहे. आज प्रत्‍येकजण स्‍वच्‍छतेविषयी जागरुक आहे. यापुर्वी स्‍वच्‍छता कर्मचाऱ्यांना हिन वागणूक मिळत असे, मात्र अभियानामुळे त्‍यांच्‍या आत्‍मसन्‍मानात वाढ झाली असून त्‍यात आणखी वाढ होण्‍यासाठी केंद्र सरकार वचनबध्‍द आहे. आज सफाईसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर सर्वत्र होत असल्‍याने मानवीश्रमात बचत होण्‍यास मदत झाली आहे. केंद्र सरकारबरोबरच राज्‍यांनी देखील स्‍वतंत्रपणे स्‍वच्‍छता विषयक उपक्रमांना चालना देण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे. याचबरोबर जिल्‍हा परिषदा, पंचायत समित्‍या, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी देखील अभियान राबवत केंद्र, राज्‍याच्‍या स्‍वच्‍छता उपक्रमांत सहभाग नोंदवत पारितोषिके मिळवण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
यानंतर नरेंद्र मोदी यांनी युवकांना स्‍वच्‍छतेच्‍या क्षेत्रात कार्यरत होत स्‍वच्‍छ भारताचे स्‍वप्‍न सत्‍यात उतरविण्‍याचे आवाहन केले. प्रारंभी मनोहरलाल खट्टर यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका मांडत स्‍वच्‍छ भारत २०२४ या अभियानात सक्रिय सहभागी होण्‍याचे आवाहन उपस्‍थितांना केले.

(चौकट)
७४.७८ कोटींचा प्रकल्प …
सातारा पालिकेकडून पाणीपुरवठा योजनेला आधुनिकीकरणार्ची जोड दिली जात आहे. या प्रकल्पाची किंमत ७४.७८ कोटी आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जलमापके बसविले जाणार आहेत. सांबरवाडी व जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे स्वयंचलन स्काडा’ प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १८ टाक्यांजवळ स्काडा सेंटर उभारून पाण्याची गरज, पाण्याचा दाब, संबंधित भागाला केला जाणारा पाणीपुरवठा याचे नियंत्रण केले जाणार आहे. याशिवाय १३३ ठिकाणी प्रेशर ट्रान्समीटर व १३३ मोठे बल्क मीटर बसविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

Adv