अजित दादाच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात अच्छे दिन येणार कधी

238
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Adv

सातारा जिल्हा राष्ट्रवादिचा बालेकिल्ला राहिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अच्छे दिन येणार तरी कधी अशी प्रतीक्षा आता करावी लागणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात लक्ष घालणार का अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे

सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सातारा जिल्हा अच्छे दिन येणार कधी असा प्रश्न आता उपस्थित झाला असून कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथाध्यक्ष शरद पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी पवार साहेबांची भेट घेतल्याने खळबळ उडाली तर दुसरीकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांनीही शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती लावल्याने दादा गट वाढण्याचे ऐवजी खुटण्याच्या दिशेने निघाल्याचे दिसत आहे

खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष पक्ष वाढवणार तर कधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषद आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,राज्यसभा खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे पक्ष वाढवण्यासाठी सपशेल अपयशी होत असल्याचे दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नेत्यांवर जिल्ह्यात विश्वास ठेवला मात्र पक्ष वाढीसाठी कोणताही नेता धावपळ करताना दिसून येत नसल्याने या पदांचा उपयोग तरी काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे

Adv