
गणेश विसर्जन काही तासांवर येऊन ठेपला असताना गजबजलेल्या भर मोती चौकात वाहतूक विभागातील पोलीस दादा दिसेना झाल्याने गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडणार का असा प्रश्न सातारकर यांना पडलेला आहे
आज आणि उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा दिवस असून गोलबाग, राजवाडा, मोती चौक परिसरात भर दुपारी पोलीस दादाच नसल्याने वाहतुकीचा खेळ खंडोबा उडाला याचे रूपांतर किरकोळ स्वरूपात नागरिकांच्या वादावादीत झाले ऐन गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी जर वाहतूकिचे तीन तेरा वाजत असतील तर करतोय तरी काय असा प्रश्न इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडलेला होता
गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी मोठ्या गाजावाजा करत वाहतूक मार्ग पोलीस दादांनी दाखवला व आपले काम संपले असेच चित्र सध्या मोती चौकात पाहायला मिळाले यंदाच्या गणेशोत्सवात वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसून आले मोठ्या थाटामाटात पोलिसांनी गणेशोत्सवात नियमांचे पालन करण्यास सांगितले मात्र वाहतूक विभागाचं नियमांचे पालन करत नसताना दिसून येते इथून पुढे तरी वाहतूक सुरळीत व्हावी अशी बुद्धी गणेशाने वाहतूक विभागाला द्यावी अशीच चर्चा येथील नागरिक करत होते