यादव साहेब संध्याकाळच्या गर्दीवर तोडगा काढा

425
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

ऐन गणेशोत्सवाच्या काळात साताऱ्यातील लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला असल्याचे रोज पाहायला मिळत असून सातारा शहर पोलीस वाहतूक विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते

सातारा शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून देवी चौक मोती चौक राजवाडा गोलबाग चौपाटी या रस्त्यावर सायंकाळी 7 नंतर प्रचंड ट्रॅफिकची समस्या निर्माण होते मात्र सातारा शहर पोलिस वाहतूक विभागाचे याकडे कानाडोळा असल्याचे चित्र दिसून येते वाहतूक विभागाचे काम फक्त क्रेन ने गाडी उचलणे व जामर लावणे एवढेच आता राहिले असल्याचे दिसून येते त्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे

गाडी नो पार्किंग मध्ये असली तर ती इमानदारीने उचलण्याचे काम सातारा शहरात फिरणारी क्रेन करते पण वाहतूककिस अडथळा होणाऱ्या मुख्य रस्त्यावर सायंकाळच्या वेळी कुठेही वाहतूक सुरळीत होताना दिसत नाही वाहतूक विभागाचे यादव साहेब यातून काही मार्ग काढणार की सर्वसामान्यना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार हे मात्र आता बघणे उत्सुकतेच असेल

Adv