सातारा शहरात गणेश मंडळाची कमिटी होणार स्थापन?

416
Adv

गणेश आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात व्यापारी व गणेश मंडळ असे गैरसमज झाले यानंतर काही गणेश मंडळाच्या युवकांनी मीटिंग घेऊन गणेश मंडळाच्या अडचणी मांडल्या यात बऱ्यापैकी यश आले असून नगरसेवक व लोकप्रतिनिधी व्यक्तिरिक्त ही कमिटी झाली तर अजून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा युवकांच्या एकीला दहा हत्तीचे बळ येऊ शकते हे मात्र नक्की

व्यापारी व साताऱ्यातील गणेश मंडळे यांच्यात गणेश आगमन सोहळ्यावरून बऱ्याच काही गैरसमज निर्माण झाला होता याचेच रूपांतर एका मंडळामध्ये सातारा शहरातील सर्व गणेश मंडळाची बैठक झाली बऱ्यापैकी प्रश्नांवर या बैठकीत तोडगा निघाला गणेशोत्सवाच्या संदर्भात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आता युवकांच्या माध्यमातून सातारा शहराची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या कमिटीमध्ये साताऱ्यातील नगरसेवक. नगरसेविकांचे पती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी बाजूला ठेवून ही कमिटी केली तर युवकांच्या एकीला दहा हत्तीचे बळ येणार असून शहरातील कोणत्याही युवकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर पदांवर या कमिटीत राहवे अशी अपेक्षा या युवकांची असून राजकारण विरहित ही कमिटी होणार असल्याचे काही युवकांनी सांगितले

पोलीस प्रशासन व गणेश मंडळाची जिल्हास्तरीय बैठक दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात झाली नसल्याने
सातारा शहरात त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला याचा फटका बसला तो काही गणेश मंडळाना ही बैठक झाली असती तर बऱ्यापैकी प्रश्न तिथे मार्गी लागले असते अशी चर्चा काही त्या दिवशी मंडळाच्या मंडळात ऐकव्यास मिळते

Adv