
ऐन सणासुदीच्य काळात राजपथावर वाहतुकीची कोंडी ही जणू आता प्रथा पडली असून सातारा वाहतूक विभाग याकडे लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य सातारकर विचारत आहेत
राजवाडा चौपाटी,गोलबाग,मोती चौक,मारवाडी चौक ते देवी चौक या रस्त्यावर दररोजची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते या वाहतूक कोंडीचा सातारकर यांना प्रचंड त्रास होत असतो ठराविक ठिकाणीच पोलीस दादा उभे असल्याचे चित्र दिसून येते या वाहतूकंडीवर सातारा वाहतूक विभागाने कारवाई करून या होणाऱ्या वाहतुकीचा अडथळा प्रकरणी सातारकर यांची सुटका करावी अशी मापक अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत
व्यापारी वर्गाच्या दुकानांसमोर भली मोठी चारचाकी वाहने धुळ खात पडलेली आपल्याला दिसून येतात ही चार चाकी वाहने कोणाची हे एक कोडेच पडलेले आहे मोती चौक ते देवी चौक पार्किंगची समस्या असल्याने वाहतूक कोंडी ही ठरलेली असून त्यातून शासनाचा कर न चुकवणाऱ्या सातारकरांची कधी सुटका होणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे