
सातारा जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकत असताना भारतीयजनता पार्टीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सातारा जिल्ह्यात कमळ फुलवले अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्ताच्या (म्हणजे मूळ काँग्रेसी विचाराचे) असलेले जिल्ह्याचे धैर्य गमवलेल्या टीमने जिल्हाध्यक्षसह सर्व पदाधिकारी यांना सोयीस्कर विसर पडला असलेले दिसून आला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले मात्र सध्याचे जिल्हाध्यक्षंसह( मूळ कांग्रेस विचारी) सर्वच पदाधिकारी यांना जुन्या जाणत्या नेते पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा विसर पडला असल्याचे दिसून आल्याने ही नक्की भारतीय जनता पार्टी आहे का अशी कुजबूज तिथे बसणारे कार्यकर्ते करत होते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, प्रमोद महाजन पांडुरंग फुंडकर, यांच्यासह बऱ्याच नेत्यांबरोबर सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काम केले आहे योग्य सन्मान पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला असता तर पक्षाबद्दल व संबंधित जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर अजून विश्वास वाढला असता मात्र तसं न झाल्याने जुने जाणते पदाधिकारी नाराज झाले
देशात व केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे सत्तेच्या मोहाबाई या न त्या झेंड्याखाली (मूळ कॉंग्रेस विचारी) असलेले सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षांसह भाजपचे विद्यमान जिल्ह्याचे पदाधिकारी आसरा घेताना दिसत आहेत मात्र ज्यांनी पक्ष वाढसाठी लाट्या खाल्या आपला संसार उघड्यावर टाकून सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलवले असेच नेते व पदाधिकाऱ्यांचा विसर पडल्याने नक्की भाजप कोणाच्या दावणीला अशी शंका उपस्थित झाली आहे
माजी आमदार कांताताई नलवडे,गजाभाऊ कुलकर्णी,अमित कुलकर्णी,माजी नगरसेवक विजय नाफड, विजयाताई भोसले,दत्ताजी थोरात,स्वर्गीय संजय जोशी,हेमांगी जोशी, अविनाश फरांदे,सुहास पोरे,यांच्यासह बरेच जुने जाणते भाजपा पधादिकारी यांचा सोईस्कर आताच्या जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी यांना यांचा विसर पडला असल्याचे दिसून आले






