
भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 1 ते 5 ऑगस्टपर्यंत रेड व ऑरेंज अलर्ट चा इशारा दिल्या नंतर सातारा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व धबधबे व पर्यटन स्थळ या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी बंदी केली होती कास तलाव्या वरती पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कागदावर आणि पर्यटक कास्तलावर अशीच परिस्थिती बघायला मिळाली
मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे कास तलाव व इतर पर्यटनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदीचा आदेश काढला होता याला सरळ सरळ पर्यटकांनी कोल दांडा देऊन कास तलाव्या वरती आपला शनिवारचा दिवस एन्जॉय करून पावसाचा मनमुराद आनंद लुटला या कास तलाव्यावरती ना कुठली पोलीस सुरक्षा होती ना कुठली विभागाची टीम त्यामुळे अनुचित प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे
जिल्ह्यातील पर्यटनाकडे जाणारे रस्ते बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभाग व संबंधित गावातील वन समितीकडे दिले होते मात्र कोणतीही सुरक्षा नसल्याने पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असलायचे दिसून आले त्यामुळे जिल्हाधिकारी पोलीस व वन विभाग यांच्या हलगर्जपणा वर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे






