राष्ट्रवादीचा कार्यकर्ता झाला बिगारी साताऱ्यातील बिल्डर मालामाल?

542
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती ती साताऱ्यातील ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्या बिल्डर लॉबीची त्यामुळे पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता झाला बिगारी आणि बिल्डर झाला मालामाल अशीच चर्चा साताऱ्यात रंगली होती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोवई नाक्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले कुठलाही गाजावाजा न करता हे उद्घाटन संपन्न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या यात भर पडली ती साताऱ्या तील एका नामांकित ओढ्यावर अतिक्रम करून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या बिल्डरची पक्षाच्या उद्घाटना वेळी ना जिल्हाध्यक्ष ना आमदार पुढे या बिल्डरची लूडबुड नेमकी कशासाठी होती असा प्रश्न सातारकरांना पडला आहे

पक्ष वाढ साठी अहोरात्र काम करतो तो पक्षाचा कार्यकर्ता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्घाटना वेळी उलटे चित्र पाहायला मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढणार तरी कशी अशी शंका उपस्थित झाली आहे..जेमतेम दोन-तीन कार्यकर्ते वगळता या कार्यालयाकडे ना कोणता आमदार फिरतो ना कोणता मंत्री मग नेमके कार्यालय सर्वसामान्यांसाठी आहे का बिल्डर लॉबीसाठी आहे हे एक पडलेले जिल्ह्याला कोडेच म्हणावे लागेल

Adv