राष्ट्रवादीचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

336
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":2,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 25 वा वर्धापन दिन सातारा शहरांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पोवई नाका येथील कार्यालयात सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . नितीन काका यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात राष्ट्रवादी पार्टीची आगामी वाटचाल याला शुभेच्छा देत पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याचे आवाहन केले

पक्षाचे कार्याध्यक्ष यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसून काम करावी आणि पक्ष संघटना वाढवावी असे आवाहन केले . यावेळी माऊली ब्लड बँकेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे 100 सदस्यांनी रक्तदान केले

या कार्यक्रमास माननीय शिवाजीराव महाडिक, बाबुराव संकपाळ, श्रीनिवास शिंदे,बाळासाहेब बाबर, सीमा जाधव, स्मिता देशमुख,संगीता देशमुख, प्रकाश येवले, किरण साबळे पाटील ,सचिन बेलागडे, शशिकांत वायकर राजाभाऊ घाडगे, सागर पाटीलविजयसिंह यादव ,सुजाता भोसले, सूर्यकांत बर्गे,बंडा गोडसे, नितीन शिंदे, सादिक इनामदार,अरुण माने, राहुल वेताळ पोपट जगताप, अमोल कदम,अमृत गोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Adv