बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला असून सुनेत्रा पवार यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्याबाबतची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आज पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे.
मानकर आणि देशमुख यांचं अजित पवार यांना पत्र
आदरणीय दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात यावे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल. तरी कृपया वरील ठरावाचा आपणाकडून विचार व्हावा, ही नम्र विनंती.
अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही १० पैकी ८ जागा जिंकून खरी जनतेच्या न्यायालयात राष्ट्रवादी आपलीच’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले.आज राष्ट्रवादी काँग्रेसला २५ वर्ष पूर्ण होत आहेत.अजित पवार यांच्या फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन साजरे होत आहेत.वर्धापनदिना निमित्त पुणे शहरात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याचा ठराव केला.