वीज चोरी प्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तीन ठिकाणच्या वीज चोरी प्रकरणी मोहित शांतीलाल कटारिया रा. सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांचे लाईट बिल थकीत असेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ त्या नागरिकांचे विद्युत कनेक्शन कट करते विद्युत महामंडळ या मोठ्या थकबाकीदारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे
कटारिया यांच्याकडून जवळपास महाराष्ट्र राज्य विद्युत महा मंडळाला 40 लक्ष रुपये येणे बाकी असून सिटी सेंटरचे सर्वेसर्वा मोहित कटारिया यांना शाहूपुरी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलवले असून नक्की शाहूपुरी पोलीस अधिकारी काय कारवाई करणार याकडे तर सर्वांचे लक्ष लागले आहे