मोदी सरकारमुळे साखर कारखाने वाचले खा उदयनराजे

403
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

शिरवळ : काँग्रेसच्या काळात सहकारी साखर कारखान्यांवरती लादला गेलेला इन्कम टॅक्स मोदी सरकारने काढून टाकला. हा टॅक्स रद्द झाल्याने देशातील सर्व सहकारी साखर कारखाने वाचले, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

शिरवळ, ता. खंडाळा येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाढवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब देशमुख, सरपंच रवी दुधगावकर, उपसरपंच ताहीर काझी, माजी सरपंच दशरथ निगडे, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, माजी उपसरपंच आदेश भापकर, प्रकाश परखंदे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम देशमुख, दिलीप गुंजवटे आदींची उपस्थिती होती.

उदयनराजे भोसले म्हणाले, लोकहितासाठी महायुतीचे शासन राज्य सत्तेवर आले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी महायुती सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा विकास कामासोबत जाण्याचा निर्णय ठरला आहे. यापूर्वी स्वार्थी लोकांच्या खिशात शासनाचा निधी जात होता, तो आता लोकांच्या दारात पोहचतो आहे असे ही उदयनराजे म्हणाले.

या प्रसंगी आमदार मकरंद पाटील म्हणाले, घरातील विवाह सोहळ्यामुळे मी गुंतून पडलो होतो. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सुरुवातीचा काही काळ मला येता आले नव्हते, मात्र वाई येथे दोन मेळावे पार पडले. अजितदादांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेतील उंचांकी गर्दी पाहून आपण खासदार उदयनराजे सोबत ठाम उभे राहिलो असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कुठलीही शंका न ठेवता आत्तापासूनच सर्व गोष्टी नियोजन करून जास्तीत जास्त मतदान हे कमळ चिन्हाला पडेल याची काळजी घ्यावी.असे ते पुढे म्हणाले.

*लोकसभेला कमळ…* विधानसभेला घड्याळ
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही सर्वजण लोकसभेसाठी कमळ चिन्हाचे काम करत आहात, मात्र विधानसभेला आपल्याला घड्याळाचे काम करायचे आहे.

Adv