
कराड : महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. तरुणांचा अलोट उत्साह आणि महिला अबाल ,वृद्धांनी अतिशय प्रसन्न वातावरणात उदयनराजेंचे स्वागत केले.
प्रीतीसंगम घाटावरून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये तीन ओपन जीप ठेवण्यात आल्या होत्या. सर्वात पुढच्या जीपमध्ये खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, एडव्होकेट विकास पवार उभे राहिले होते. मागील दोन्ही जीपमध्ये कराडातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई रयत क्रांती संघटना बळीराजा संघटना, जोगेंद्र कवाडे गट यांचे स्थानिक पदाधिकारी होते. रेल्वे स्टेशन रोड मार्गे जनता बँक, महात्मा फुले चौक, बापूजी साळुंखे पुतळा ,सिटी पोस्ट ऑफिस ,कर्मवीर पुतळा ,दत्त चौक, शाहू चौक, दत्त चौक ,परमार लाईट हाऊस, आझाद चौक, नेहरू चौका पासून विठ्ठल चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये शेकडो दुचाकी चालक देखील सहभागी झाले होते. भगवा फेटा घातलेल्या तरुणी व महिला रॅलीच्या अग्रभागी होत्या. प्रीती संगमापासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या जयघोषात रॅलीला सुरुवात झाली. चावडी चौक ज्योतिबा मंदिर ,कृष्णा नाका सर्कल, महात्मा फुले चौक, सिटी पोस्ट ऑफिस, दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक या ठिकाणी फटाक्यांच्या आतिशबाजी करण्यात आली.
संपूर्ण रॅलीमध्ये उदयनराजे प्रेमी त्यांचे शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून कराडकर जनता उदयनराजे याचे स्वागत करत होती.
या रॅलीमध्ये माजी सभापती हनुमंतराव पवार, सुधीर एकांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आप्पासाहेब गायकवाड , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीर ,राजेंद्र माने, नगरसेविका स्मिता हुलवान, आमदार आनंदराव पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, माजी नगरसेवक गजेंद्र कांबळे ,ओंकार मुळे, विजय वाटेगावकर, संदीप थोरवडे, गणेश भोसले, सुलोचनाताई पवार, कल्पना पवार, निशांत ढेकळे, काकासाहेब जाधव, सुदर्शन पाटसकर, रणजित पाटील, मनसेचे दादासाहेब शिंगण आदींसह हजारो कार्यकर्ते या रॅली सहभागी झाले होते.
————