
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज व राज्यसभा सदस्य श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे देशभरात नावलौकिक प्राप्त नाव आहे. आज यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, सातारा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी श्री. छ. खा. उदयनराजे महाविद्यालयात आले होते. या वेळेला त्यांची छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी पुढे सरसावल्या होत्या. एवढेच नव्हे तर एक नेता…. एकच आवाज.. उदयनराजे… उदयनराजे… अशी जयघोष करून संपूर्ण महाविद्यालयातील परिसर दणाणून गेला होता.
यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालया मध्ये वाय सी सायन्स एक्जीबिशन फेअर दिनांक ४ व ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळेला विद्यार्थ्यांनी स्वकष्टातून एकूण ५१ स्टॉल उभारले होते.
जूनियर विभागाचे ७ स्टॉल होते.सीनियर विभागाचे ४६ स्टॉल होते.
या फेअरच्या कॉर्डिनेटर डॉक्टर नेहा बेंद्रे होत्या.तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी टी जाधव, डॉक्टर जे.जे. चव्हाण, डॉक्टर ए. पी. तोरणे डॉक्टर एस. ए. भोईटे, डॉक्टर एस .टी. कांबळे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. श्री.छ.खा.उदयनराजे महाविद्यालय परिसरात येताच अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये त्यांची छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या वेळेला त्यांच्या समवेत सुनील काटकर, विनीत पाटील सनी भोसले व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. आपल्या महाविद्यालय जीवनात घडलेल्या अनेक किस्से उदयनराजेंनी सांगितले. जोर जोरात टाळ्या वाजवल्या की प्रमुख वक्ते कमी बोलतात. त्यामुळे मी कमी बोलतो. पण त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवली तेव्हा मात्र खूप मोठा जल्लोष झाला. या जल्लोषाने सर्व परिसर उदयनराजेमय झाला होता. खऱ्या अर्थाने या फेअरचे सांगता करण्यात आली.