भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी.. चिन्मय कुलकर्णी

398
Adv

सातारा : कोणताही राजकीय वारसा नसताना कॉलेज जीवनापासून केवळ समाजकारण आणि समाजासाठी काम करणे हाच उद्देश आणि तेच स्वप्न उराशी बाळगून काम करणारे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील चिन्मय कुलकर्णी. याची नुकतीच भाजपाच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीने भाजपाच्या युवावर्गात एक चैतन्यांचे, उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माण तालुक्यामध्ये कुकुडवाड या छोट्याशा गावातले चिन्मय कुलकर्णी हे. त्यांनी कॉलेज जीवनात समाजकार्याला सुरुवात केली. रस्त्यावर दररोज घडत असलेले अपघात, त्या अपघातात जाणारे जीव पाहून त्यांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा मुद्दा घेतला. एखादा मुद्दा हातात घेतला तर तो तडीस नेणारा हा खरा कार्यकर्ता असतो. त्याप्रमाणे त्यांनी महामार्गावर पडलेले खड्डे, झालेले खराब रस्ते यावर आवाज उठवून तत्कालिन प्रशासनाची झोप उडवून दिली होती. प्रशासनाला महामार्गाचे चांगले काम करायला त्यांनी भाग पाडले होते. कोरोना काळात सुद्धा त्यांनी गोरगरीब वंचितांच्या मदतीला धावून जाण्याचे सदकार्य केले. कोणताही आणि कसलाही राजकीय घरात पिंड नाही, राजकीय वारसा नाही. परंतु त्यांचे सुरु असलेले समाजकार्य, लोकांच्यासाठी सुरु असलेले तळमळ पाहूने त्यांची नाळ भाजपाशी जोडली गेली. त्यांना नुकताच सातारा जिल्हा युवानोर्चा भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे त्यांना नियुक्तीपत्र प – दान करण्यात आले. यावेळी बोलताना चिन्मय कुलकर्णी म्हणाले, सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस आहे. एका सर्वसामान्य घरातून येताना कोणताही राजकीय वारसा नसताना आज जगातील सर्वात मोठ्या अशा भाजपाने माझी सातारा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली याचा खुप अभिमान मला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला देणारे आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे महामंत्री विक्रांत दादा पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सौ.प्रियाताई शिंदे, माजी आमदार दिलीप येळगांवकर, मदन भोसले ,अतुल भोसले, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, शिवाजीराव शिंदे, सोमनाथ भोसले, काका धुमाळ, संग्राम बर्गे, विशाल बागल, अमृत मारणे, सुदर्शन पाटसकर , तेजस गडाळे, सागर शिवदास, विट्ठल बलशेठवार सर्व नेते सरचिटणीस जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष यांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवड केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.व सर्व युवा वर्ग भाजपच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मी कायम करत राहीन, असा विश्वास व्यक्त करतो, असे चिन्मय कुलकर्णी यांनी सांगितले.

Adv