विलासपूर परिसरातील यशस्वी उद्योजक व छ उदयनराजे भोसले यांचे समर्थक संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकाचे खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासह मित्र समूहाचे काका धुमाळ, संग्राम बर्गे,पंकज चव्हाण,सौरभ सुपेकर,अभय मोहिते,महेश चौगुले गणेश नलवडे अमोल भारती निलेश पाटील मुकुंद देवकर गणेश बुरुंगले इत्यादी यावेळी उपस्थित होते
संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते यावर्षी सुद्धा हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे मित्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका ची उपयुक्तता मोठी असून परिसरातील महत्त्वाचे टेलीफोन नंबर तसेच दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त पडणारी माहिती यामध्ये नमूद करण्यात आली आहे कॅलेंडरचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून ही दिनदर्शिका सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध आहे उद्योजक संग्राम बर्गे हे सतत उद्यमशील स्वरूपाचे नेतृत्व असून अशाच कार्यकर्त्यांमुळे समाजाला निश्चित दिशा मिळते दिनदर्शिका प्रकाशनाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून संग्राम बर्गे यांच्या माध्यमातून विलासपुर सारख्या हद्दवाढीतील नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटण्यास मदत झाली आहे या शब्दांमध्ये छ उदयनराजे यांनी मित्र समूहाच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या