शिवतीर्थच्या आसपास नवा आयलँडचा घाट तरी कशासाठी?

680
Adv

पोवई नाक्यावरील शिवतीर्थच्या परिसरात नवा आयलँडचा घाट कशासाठी घातला जातोय असा प्रश्न आता शिवसेनेचेजिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या पत्रानंतर उपस्थित होत आहे

राजधानी साताऱ्यात पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा परिसर शिवतीर्थ म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये सदरचा जुना आयलँड गोडोलीच्या दिशेने होता तो जुना आयलँड काढल्याने शहरातील वाहतूक सुरळीत पणे सुरू झाली मात्र आता त्याच ठिकाणी नवीन आयलँड करून वाहतुकीस अडथळा निर्माण करून शिवतीर्थच्या सुंदर देखण्या रूपाला दृष्ट लावण्याचे कामच एक प्रकारे होत असल्याचे दिसून येते याप्रकरणी सातारकर आपली काय भूमिका काय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे

जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या पत्राने नव्या वादाला तोंड फोडले असून जिल्हाप्रमुख शेलार यांच्या तालुक्यात एका छोट्याशा आयलँडला जागा नाही का असा प्रश्न उभा राहिला आहे शेलार यांना शहरात सातारा शहराचे विद्रूपीकरण करायचे आहे का असा प्रश्न शेलार यांच्या पत्रानेच उपस्थित होत आहे

सातारा शहरात नवा आयलँड उभा करायचा हे ठरवणारे शेलार कोण?
सातारा पोवई नका परिसरात आजूबाजूला मोकळी जागा असून या परिसरात एक आयलँड उभा करून विकसित करण्याचा विचार असल्याचा उल्लेख जिल्हाप्रमुख शेलार यांच्या पत्रात असून शहरात आयलँड उभा करण्याचा अधिकार शेलार यांना कोणी दिला असा प्रश्न साताऱ्यातील नागरिक विचारत आहेत

शिवतीर्थाच्या परिसरामुळे साताऱ्याचे वैभव हे उठून दिसते मात्र याच शिवतीर्थच्या समोर नवीन आयलँड करून शहराचे विद्रूपीकरण करण्याचा एक प्रकारे प्रयत्न होत असून याप्रकरणी आता सातारकर नागरिकांनी आवाज उठून या आयलँडला विरोध केला पाहिजे व आपल्या शिवतीर्थाचे पावित्र्य राखले पाहिजे अन्यथा प्रत्येक चौकात असे आयलँड उभे राहिल्यास शहराचे विद्रूपिकरण होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की

Adv