गोलबाग येथे दोन महिन्यांपूर्वी आप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार झाला होता याप्रकरणी आता सातारा पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे
दिनांक ९/११/२०२२ रोजी रात्री २०.३० वा. सुमारास फियांदी दिपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे हे त्यांचे मित्रांना भेटण्याकरीतागोलबाग सातारा येथेगेले असताना २० ते २५ वयोगटातीलतीनइसम तेथे आले व त्यामधील एका इसमाने त्याच्या कडील पिस्तुलातून फिर्यादी यांचेवर बेछूट गोळीबारकरून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं ३५८ /२०२२ भादंवि कलम ३०७,३४ सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये यापुर्वी गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस व दोन अल्पवयीन बालकांना दिनांक १०/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून एका आरोपीकडून गुन्हयात वापरलेले पिस्टल हस्तगत करून पुढील कारवाई करीता शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले होते.तदनंतर सदर गुन्हयाचा मुख्य सुत्रधार याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडून समांतर तपास चालू होता.सदर तपासामध्ये मुख्य सुत्रधार ऋषभ जाधव याचेकडे एकूण तीन पिस्टल असल्या बाबतची खात्री लायक माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे इसम नामे सुयोग कदम याचेकडे एक पिस्टल असल्याची खात्रीलायक माहितीवरुन त्यास दि २४/११/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याचेकडून एक पिस्टल हस्तगत करण्यात आली होती.
गुन्हयातील मुख्य सुत्रधार ऋषभ जाधव व त्याचा साथिदार चंद्रकुमार निगडे यास शाहुपूरीच्या तपास पथकाने पुणे येथून दिनांक २४/१२/२०२२ रोजी ताब्यात घेवून अटक केली आहे. गुन्हयाच्या समांतर तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्त्याखाली कार्यरत असणान्या विशेष तपास पथकास नमुद गुन्हयातील मुख्य सुत्रधाराने एक पिस्टल दोन चंद्रकुमार निगडे याचे मदतीने लपवून ठेवली असल्याची माहिती दिल्याने दिनांक २६/१२/२०२२ रोजी गुन्हयात वापरलेले २५,०००/- रुपये किंमतीचे पिस्टल हस्तगत केले आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, शाहुपूरी पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, स पो नि बधे, पो उ नि अमित पाटील, पोलीस अंमलदार विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, शरद बेबले, लक्ष्मण जगधणे, प्रविण फडतरे, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमित माने, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार, स्वप्निल पवार यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.