
सातारकरांसाठी हक्काचे खरेदीचे आणि मनोरंजनाचे व्यासपीठ असणाऱ्या नक्षत्र महोत्सव 2022 चे आयोजन दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यान सातारा सैनिक स्कूलच्या ग्राउंड वर करण्यात आले आहे. नक्षत्राच्या मंडप उभारणीचा नारळ नुकताच फुटला यावेळी नक्षत्र महोत्सव समितीच्या माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजे महाडिक, स्नेहल राजे शिर्के, सौ माया पवार, धनश्री महाडिक, कल्पना चतुर, आशा जाधव, अरुणा नागरे, सुनीता फरांदे, सीमा किर्दत,आणि अलका शेटे इत्यादी संयोजक सदस्य उपस्थित होत्या
नक्षत्र महोत्सवाच्या अध्यक्षा सौ दमयंती राजे भोसले यांच्या कल्पक नियोजनाप्रमाणे नक्षत्र परिवाराची गेल्या दहा वर्षापासून दमदार वाटचाल सुरू आहे नक्षत्र म्हणजे दर्जेदार खरेदी आणि निखळ मनोरंजन हे समीकरण तयार झाले आहे यंदा सुद्धा नक्षत्र दिनांक 9 ते 13 डिसेंबर 2022 दरम्यान सातारकारांच्या भेटीला येत असून सैनिक स्कूलच्या मैदानावर तब्बल 207 स्टॉल उभारण्यात येत आहेत सकाळी दहा ते रात्री दहा अशी प्रदर्शनाची वेळ आहे
यंदाच्या नक्षत्र प्रदर्शनामध्ये बच्चे कंपनीसाठी डिज्नीलैंडचे मोठे आकर्षण असणार आहे या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू महिलांसाठी आकर्षक वस्तू खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स याशिवाय साताऱ्यात जे काही मिळत नाही अशा युनिक वस्तूंचे वेगवेगळे स्टॉल्स सुद्धा यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे त्यामुळे सातारकरांनी नक्षत्र प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नक्षत्र परिवाराच्या सदस्या आणि माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी केले आहे








