बँकेच्या योजनांमध्ये खातेदारांनी सहभाग घ्यावा : नितीन पाटील

185
Adv


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळोवेळी ग्राहकाभिमुख योजना राबवत असते. या योजनाना ग्राहक खातेदारांचा कायमच चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने घरातील कमावती आणि जबाबदार व्यक्ती विमा संरक्षित असणे महत्वाचे आहे. या उदात्त भावनेने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार जमा होणारे सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यामधील कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पगारदार खातेदार व बँकेचे सर्व सेवक यांच्यासाठी सॅलरी पॅकेज योजने अंतर्गत अपघात विमा संरक्षण योजना सुरु केली आहे. सदर योजना टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कं.चे माध्यमातून राबविली जात आहे. या योजने अंतर्गत बँकेच्या मल्हारपेठ ता. पाटण शाखेत पगार होणाऱ्या संत तुकाराम विद्यामंदिर, मल्हारपेठ येथील शिक्षिका छाया राजेंद्र सावंत यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचे पती राजेंद्र आनंदा सावंत यांना विमा संरक्षित रक्कम रु.30 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या पॉलिसी अंतर्गत अपघात विमा घेणाऱ्या व्यक्तीला अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास वारसाला विमा क्लेम रक्कम प्राप्त होत आहे. यासाठी बँकेने टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कं. या विमा कंपनीचे माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. पॉलिसीमध्ये सहभागी होणाऱ्या पॉलिसी धारकांना जास्तीत जास्त रु. 30 लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षित रक्कम पगारदार सेवकाच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट किंवा जास्तीत जास्त 30 लाख एवढी विमा संरक्षित रक्कम निश्चित करता येणार आहे. आजपर्यत सदर योजनेंतर्गत सुमारे 8561 पगारदार खातेदारांनी सहभाग घेतला असून त्यापैकी अपघाती मृत्यू झालेल्या 6 खातेदारांच्या वारसांनी क्लेम सादर केले आहेत. या पॉलिसी मध्ये बँकेत पगार होणाऱ्या जास्तीत जास्त खातेदारांनी सहभागी होवून विमा संरक्षित व्हावे.

त्याचप्रमाणे खातेदारांना खात्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (झचडडध) 2 लाख व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (झचगगइध) 2 लाख या योजने अंतर्गत विमा संरक्षण मिळत आहे. यामध्ये आजपर्यत झचगगइध योजनेत 69385 खातेदार सहभागी झाले असून यामध्ये सुमारे 181 खातेदारांना प्रत्येकी रु 2 लाख प्रमाणे एकूण 3 कोटी 62 लाख चा जीवन विमा क्लेम आणि झचडइध योजनेत 267863 पात्र खातेदार सहभागी झाले असून यामध्ये सुमारे 80 खातेदारांना प्रत्येकी रु 2 लाख प्रमाणे एकूण 1 कोटी 60 लाख चे अपघात विमा क्लेम प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या खातेदारांना वरील सर्व पॉलिसी मधून एकूण 34 लाखाचे अपघात विमा संरक्षण प्राप्त होत आहे. त्यासाठी योजनेत विहित नमुन्यातील संमती पत्र भरून सहभागी होणाऱ्या पगारदार खातेदारास विहित नमुन्यातील संमती पत्र भरुन सहभागी होणाऱ्या पगारदार खातेदारास 1 लाख विमा संरक्षित रकमेसाठी वार्षिक रु.22/- इतका नाममात्र प्रिमियम आहे. यानुसार पगारानुसार होणाऱ्या विमा संरक्षित रकमेवर जास्तीत जास्त रु.660/- मध्ये रु. 30 लाख, दोन्ही प्रधानमंत्री विमा योजनेसाठी रु.342 /- मध्ये 4 लाख असे एकूण रु.1002/- प्रिमियम मध्ये एकत्रित 34.00 लाख रुपये विमा संरक्षण प्राप्त होत आहे. तसेच अपघात योजनेत सहभागी होणाऱ्या खातेदार शेतकरी सभासदांचा विमा प्रिमियम बँकेने स्वतः भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे खातेदारांना रु. 2 लाख चे मोफत अपघात विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. विमा योजनांमुळे घरातील कमावती आणि जबाबदार व्यक्ती अचानक मरण पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा मोठा आधार मिळणार आहे.

Adv