शाहूनगरच्या पाण्यासाठी सागर भोसले पुन्हा आक्रमक

278
Adv

शाहूनगर भागासाठी जय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले पुन्हा आक्रमक झाले आहेत भल्या पहाटे चार भिंती येथील टाकीवरती कार्यकर्त्यांच्या उपस्थिती टाक्या भरून घेऊन शाहूनगर भागासाठी पूर्ण क्षमतेने पाणी कसे मिळेल याची जबाबदारी घेत असताना दिसून येत आहेत

जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले हे आपल्या शाहूनगर भागासाठी विविध विकास कामांसाठी प्रयत्न करताना दिसून येतात दोन महिन्यापूर्वी त्यांनी पाण्याचा प्रश्न निकाली लावला होता दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता पाहता पाण्याची पातळी सर्वत्रच खालावत चालली असल्याने शाहूनगर येथील पाण्याची टाकी भरण्यास अडचण येत होती येथील नागरिकांनी सागर भोसले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या यानंतर मात्र भल्या पहाटे सागर भोसले हे चार भिंती येथील टाकी वरती जाऊन आपल्या भागातल्या पाण्याच्या टाक्या पूर्णक्षमतेने कशा भरतील याची पुरेपूर काळजी घेऊन शाहूनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी ते काळजी घेत असुन पाणी टंचाईची तीव्रता गेल्या काही वर्षात जी भासत होती ती या वर्षी सागर भोसले यांच्या कर्तव्यदक्ष पणामुळे भासत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले

जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले यांनी शाहूनगर भागासाठी आत्तापर्यंत क्रिकेट स्पर्धा , रंगपंचमी असे विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले आहेत येथून पुढेही शाहूनगर भागासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शना खाली विकासकामात कुठेही कमी पडणार नसल्याचे जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले यांनी यावेळी सांगितले

Adv