छ.शाहु स्टेडियमवर होणार सिंथेटिक धावनमार्ग निलेश मोरे

1515
Adv

ऐतिहासिक सातारा शहरातील असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल असलेल्या छ.शाहु स्टेडियमवर विविध खेळासाठी खेळाडू सराव करत असतात. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी या स्टेडियमला नवी झळाळी आली आहे. मात्र येथे सिंथेटिक धावनमार्ग नसल्याने सरावाची अडचण काही खेळाडूंनी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांना यासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती केली. निलेश मोरे यांनी जिल्ह्याचे सुपूत्र आणि नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देत या कामासाठी पाठपुरावा केला. यावेळी उपशहरप्रमुख अभिजित सकपाळ होते.

ना. शिंदे यांनी छ.शाहु स्टेडियमवर ४०० मीटर सिंथेटिक धावनमार्ग करण्यासाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल ११ कोटी २० लाख रुपयाच्या कामाला मंजूरी दिली.

जिल्हा क्रिडा संकुल सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू क्रिडा संकुलात विविध सुविधा विकसित करण्यात आलेल्या असून सुविधांचा वापर सकाळ आणि सायंकाळ मोठया प्रमाणात होत असतो. या क्रिडांगणावर सराव करणारे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राज्य स्तरावर उत्तम कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवीत आहेत.आता सिंथेटिक धावनमार्ग उपलब्ध होणार असल्याने मैदानी खेळाचा सराव करताना खेळाडूंना सोईस्कर झाल्याने क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी ना.एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांचे अभिनंदन करत आहेत.निलेश मोरे यांनी, सातारा शहरातील विकासासाठी कामे सुचवा, शिवसेनेच्या माध्यमातून ती पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार, असे बोलताना सांगितले.यावेळी उपशहरप्रमुख अभिजित सकपाळ उपस्थित होते.

Adv