महाराष्ट्र नगरोथ्थान महाअभियानांतर्गत भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान या उपलेखा शिर्षाखाली, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन सातारा नगरपरिषदेस ७ कोटी ५३ लाख रुपयांच्या विविध १६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. एकूण ३ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेला वितरीत करण्यात आल्याचे देखिल आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या निधीमधुन प्रस्तावित केलेली विकास कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील.
नगरपरिषदेच्या माध्यमातुन विविध योजनांतर्गत जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन घेवून, जनतेची लोकोपयोगी कामे मार्गी लावण्यासाठी सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहीली आहे. सन २०२१-२२ या वर्षातील नियोजन समितीच्या आराखड्यात नगरपरिषदेच्या एकूण १६ कामांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी एकूण रुपये ७ कोटी ५३ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली असून, नियोजन समितीमधुन या कामांसाठी ३ कोटी ७६ लाख रुपये नगरपरिषदेस वितरीत करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. या नगरोथ्थान योजनेमधुन खालील कामांना प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
१. मोती चौक ते ऐक्य कॉर्नर अखेर रस्ता डांबरीकरण करणे रुपये ५७ लाख ९२ हजार.
२.पेठ करंजे तर्फ३२८/४२० हुतात्मा उद्यान येथे खेळणी बसविणे व इतर स्थापत्य कामे.२५ लाख.
३. ३२८/४२० करंजे तर्फ हुतात्मा उदयान येथे हॉल बांधणे रुपये ५१ लाख ३४ हजार.
४. पेठ गोडोली जकातनाका साईशक्ती पतसंस्था ते खामकर ते १०१ गोडोली सार्व शौचालय अखेरचा रस्ता डांबरीकरण करणे- रुपये ९ लाख ९९ हजार.
५. एकता कॉलनी ओढयालगत संरक्षक भिंत बांधणे रुपये ७४ लाख ७५ हजार.
६. कब्रस्तान पूल ते निसर्ग कॉलनी ओढयालगत संरक्षक भिंत बांधणे- रुपये ७४ लाख ७५ हजार.
७. सुयोग कॉलनी, अंजली कॉलनी, अर्कशाळानगर अंतर्गत पाईपड्रेन करणे रुपये ६ लाख.
८. पेठ प्रतापगंज आयडीबीआय बँक ते नृसिंहमंदिर अखेर रस्ता डांबरीकरण करणे रु.२१ लाख ६४ हजार.
९. मारुती मंदिर ते कोटेश्वर चौक व क्रांतिस्मृती बोळ येथे पाईपट्टेन करणे रुपये ९ लाख ९८ हजार.
१०. पेठ शनिवार, वेलणकरबोळ ते खाटीक मशिद ते खड्डा मशिद अखेर रस्ता डांबरीकरण करणे रुपये १५ लाख २५ हजार.
११.आरक्षण क्र.४२, पेठ योदोगोपाळ सि.स.नं.१३४ व १३४ अ, येथे बगिचा विकसित करणे रुपये २ कोटी २८ लाख ९० हजार.
१२. पेठ योदोगोपाळ लेले बोळ येथे रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधणे रु.२८ लाख १३ हजार.
१३. पेठ गोडोली जिजाऊ उद्यान येथे विविध सुधारणा करणे रुपये १० लाख.
१४. पेठ बसाप्पा तोडकर कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे रु.२६ लाख ९१ हजार.
१५. हुतात्मा स्मारक येथील कर्नल संतोष महाडीक स्मृती उदयान येथे कुंपण भिंत व सुशोभिकरण रु.५८ लाख ५९ हजार.
१६. हुतात्मा स्मारक येथे शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान विकसीत करणे रु.७४ लाख २४ हजार या कामांचा समावेश आहे.
या ७ कोटी ५३ लाख ३८ हजार रुपयांच्या प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या कामांसाठी २०२१-२२ सालाकरीता रुपये ३ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश देखिल जारी करण्यात आले आहेत, हद्दवाढ झालेला भाग व पूर्वीच्या नगरपरिषदेचे प्रभाग यांचा समतोल साधत वरील कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या कामांचे कार्यान्वयन जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, यांचे मार्फत होणार आहे. वरील कामे लवकरच प्रशासकीय कारकिर्दीत सुरु होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, नगरपरिषदेने तयार केलेल्या हद्दवाढ भागातील सुमारे ४९ कोटी रुपयांच्या प्रारुप
आराखडा प्रस्तावातील विकास कामांना देखिल लवकरच शासनाकडून निधी नगरपरिषसदेस प्राप्त होणार आहे.








