किल्ले अजिंक्यतारा येथील निकृष्ट बांधकाम प्रकरणी आज जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे चौकशी केली असता सदरचे काम आमचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगून आपले हात झटकले
सातारानामाने किल्ले अजिंक्यतारा येथील निकृष्ट गटार बांधकाम प्रकरणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला परंतु ते काम आमच नसल्याची उत्तरे या दोन्ही विभागाकडून मिळाली म हे निकृष्ट बांधकाम ऐतिहासिक अजिंक्यतारा केल्यावर कोणी बांधकाम केले याची उत्सुकता शिगेला पोचली असून संबंधित दोन्ही विभागाने आपले हात झटकून मोकळे झाले आहेत या बांधकामाची संशयाची एक सुई सातारा पंचायत समितीकडे जास्त वळत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते कारण की सदरचा किल्ले अजिंक्यतारा येथील रस्ता हा पंचायत समितीच्या हद्दीतच येत आहे
राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा वरती जर बांधकाम होत असेल तर ते कोणी केले हे याचा जावई शोध घेणे खूप गरजेचे असून जो कोणी ठेकेदार किल्ल्यावर येऊन बांधकाम करत असेल त्याची चौकशी पंचायत समिती करणार का हाच प्रश्न उपस्थित राहिला आहे