सातारा पालिकेला टाळे ठोकणार सचिन मोहिते

420
Adv

ऑगस्ट २०२१ मध्ये शिवसेना साताराच्या वतीने ऐतिहासीक
मंगळवार तळे,सोहनीगीरण परिसर व डॉ.बोकील गोल मारुती मंदीर शेजारी केल्या गेलेल्या बांधकामअतिक्रमणा विरोधात आंदोलन करुन नगरपालिकेला तक्रार अर्ज दिला होता. त्याबाबत नगरपालीकेने संबंधीत बांधकामाबाबत खुलासा मागविला होता व त्याचे सपष्टीकरण अर्जदार अमोल गोसावी (उपशहर प्रमुख, शिवसेना) यांना दिला. परंतू वस्तुस्थिती पुर्णपणे लपविण्यात आली होती. त्यानंतर संपुर्ण वस्तुस्थिती
जाणून घेण्यासाठी माहीती अधिकार अंतर्गत सदर तिन्ही बांधकामाची माहिती मागवली असता धकादायक प्रकार समोर आला आहे. सोहनी गिरण येथिल ९ मीटररस्ता अधिक दोन मीटर सेटबँक अंतर एकूण ११ मीटर जागा रस्त्याची अपेक्षित
असतांना संपूर्ण रस्ताच ६ मीटर शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ५ मीटर पेक्षा जास्त सरकारी हद्दीत अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच ऐतिहासीक मंगळवार तळे येथे ४ मीटर रस्ता शिल्लक आहे. त्याचबरोबर गोल मारुती येथील
बोकील डॉक्टर यांचे रस्त्यालगत ८ मीटर सलग अंतराचे बांधकाम असतांना अंतर्गत बांधकाम असे उत्तर दिले आहे. अशामुळे पदाधिकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायीक यांची असणारी भ्रष्ट युती दिसून येत आहे.

याबाबत प्रशासक असणारे मुख्याधिकारी यांनी त्वरीत निर्णय घेवून संबंधित अधिकारी यांना निलंबीत करुन अतिक्रमण काढले नाही तर येत्या काही दिवसात शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
आंदोलनाचे संयोजन शहर संघटक प्रणव सावंत यांनी केले. प्रसंगी संजय पवार, ओंकार गोसावी, शब्बीर बागवान, सचिन सपकाळ, ब्रिजेश सावंत इ.शिवसैनिक उपस्थित होते.

Adv