
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे.राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे, असंही महेश शिंदे म्हणाले. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक 9 जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आमदार शरद चंद्रजी पवार घराण्यावर निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा आरोप महेश शिंदे यांनी केलाय. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे






