
शिवसेना सातारा शहर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पंताचा गोट, दौलतनगर येथे मोफत नेत्र तपासणी आणि सवलतीच्या दरामध्ये संपूर्ण शरीराची तपासणी करणारे आरोग्य तपासणी शिबीर शनिवार दि.९ जानेवारी रोजी पार पडले.यात गरजू तब्बल ५०० हून अधिक रुग्णांची तपासणी आणि त्यांना योग्य मदत करण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख निलेश मोरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
यांच्या संकल्पनेतून आणि खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनेते नितीन बानगुडे- पाटील, वैद्यकीय मदत कक्षप्रमुख राज्य प्रमुख मंगेश चिवटे
संपर्क समन्वयक राजाभाऊ भिलारे
सातारा जिल्हा उप समन्वयक दिपक चव्हाण जिल्हा महिला समन्वयक सुनीताताई पाटणे सातारा शहर महिला समन्वयक मिनाक्षी मोरे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात पंताचा गोट आणि दौलतनगर येथे नेत्र तपासणी आणि संपूर्ण शरीराची तपासणी करणारे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि गोडोली येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.यात मोफत नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली.यावेळी तब्बल ५०० हून गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.काहींना पुढील उपचारासाठी मदत करण्यात येणार असून तर काहींनी वैद्यकीय साहित्य,औषधांची मदत केली.
दोन्ही ठिकाणच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलिमा भिताडे , अभिजित सपकाळ, सुमित नाईक,अमोल पवार, पूजा चव्हाण,सुरज जाधव,सयाजी शिंदे,प्रथमेश बाबर,अनिकेत वाडकर,सचिन कारंडे,आसिफ फकीर आदींनी परिश्रम घेतले.







