
सातारा येथील वन विभागाच्या आवारात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले मात्र शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह काही शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती मास्क नसल्याचे दिसून आले
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले असून दस्तुरखुद्द सत्ताधारी पक्षातील उपजिल्हाप्रमुख सचिन मोहितेंसह काही शिवसैनिकांना आंदोलन करताना मास्क घालण्याचा विसर पडला असे दिसून येते सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय व सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित होत असून सर्व सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती मास्क नसला तर पोलीस दादा पाचशे रुपये दंड ठोठावतात ज्याची सत्ता त्याचेच राज्य असे असेल तर हे असेच चालणार आशी अपेक्षा सातारकर नागरिक करत आहेत
महाराष्ट्रात मंत्री आमदार हेच सध्या करोनाच्या विळख्यात सापडत असून सत्ताधारी शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी तरी निदान आपले पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे त्यांच्याच पक्षातील उपजिल्हाप्रमुखांकडून नियमाची पायमल्ली होत असेल तर सर्वसामान्य जनतेवर निर्बंध कशासाठी असा प्रतिप्रश्न सातारकर नागरिक करत आहेत







