मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या नोटिशीचा पालिका प्रशासनाला विसर पेट्रोल पंपाचे लाड का?

223
Adv

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या नोटीस नंतरही पालिका प्रशासनाचा कर बुडवून वर्षानुवर्षे आपला धंदा बिनधास्तपणे चालू ठेवणाऱ्या जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंपाचे लाड करण्याचे कारण तरी काय हे मात्र सातारकरांना समजले नाही

सातारा पालिकेची मिळकत असलेल्या जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंपाला सातारा पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिनांक 3, 5, 2021 रोजी नोटीस धाडली होती की सदरची जागा आमच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही ती आमच्या मार्गाने ताब्यात घेऊ, मात्र या नोटिशीचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येते हा विसर पडण्याचे नक्की कारण तरी काय असा प्रश्न सातारकर जनतेला पडला आहे

एखाद्या नगरसेविकांनी टपरी ची तक्रार केली तर ती कोणतीही सबब न ऐकता उचलली जाते इथे मात्र खुद्द मुख्याधिकारी यांच्या नोटिशीला तीन महिने होऊन सुद्धा पालिका प्रशासन शांतपणे सातारकरांची लूट चालली असल्याचे बघत आहे पालिका प्रशासनाला पेट्रोल पंप प्रकरणी जागी येणार तरी कधी असा प्रश्न आता सातारकर जनता विचारू लागली आहे

Adv