पालिकेसह सातारकरांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई प्रकरणी स्थावर जिंदगी विभाग सुस्त

373
Adv

सातारा पालिकेच्या जुनामोटर स्टँड जागेवरील दोन्ही पेट्रोल पंप चालकांनी सातारा पालिकेसह सातारकरांची फसवणूक वीस वर्ष केली असून मुख्याधिकारी यांनी संबंधित पेट्रोल पंप चालकाला 48 तासाची मुदत देऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे आदेश असताना देखील पालिकेतील स्थावर जिंदगी विभाग मात्र याप्रकरणी सुस्त असल्याचे दिसून येते

सातारा पालिकेची मिळकत असलेला जुना मोटर स्टँड या परिसरात सातारा पालिकेची जागा असून गेल्या अनेक वर्षा पासून या जागेत दोन पेट्रोल पंप असून या पेट्रोलपंप चालकांनी वीस वर्षापासून पालिकेचा एक रुपयाचाही कर भरला नसून पालिके सोबत केलेल्या कराराचा ही भंग केलेला आहे याप्रकरणी सातारा पालिकेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी संबंधितांना 48 तासाची मुदत दिली होती मुदत संपून आठ ते दहा दिवस झाले असून याप्रकरणी स्थावर जिंदगी विभागच पुढील कारवाई करत नसल्याने शंकेची पाल मनात चुकचुकत आहे

मुख्याधिकारी साहेब वीस वर्ष लक्ष्मी दर्शन घेणाऱ्यांची यादी काढाच

मुख्याधिकारी साहेब गेल्या वीस वर्षात ज्यांनी ज्यांनी लक्ष्मी दर्शन घेऊन हा प्रश्न पुढे ढकलला त्याची यादी काढाच अशी अपेक्षा सातारकर जनता करत असून गेल्या वीस वर्षात या संबंधित विभागाचे प्रमुख यांची भूमिका ही संशयास्पद असून पालिकेतीलच गेल्या वीस वर्षातील अधिकारी असे वागत असतील तर पालिकेचे उत्पन्न वाढणार तरी कसे असा प्रश्न साताऱ्यातील नागरिक विचारत आहेत

पेट्रोल पंप चालकाचा वावर स्थावर जिंदगी विभागात का

संबंधित पेट्रोल पंप चालकाचा पालिकेत वावर गेल्या दोन दिवसापासून दिसून येत आहे हा वावर नेमका कशासाठी हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे त्यामुळे संबंधित स्थावर जिंदगी विभाग व त्यांच्या प्रमुखांनी सातारा पालिकेसह सातारकरांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर कारवाई करून आपला विभाग अस्तित्वात असल्याचे दाखवून द्यावे अशी अपेक्षा ही आता सर्वसामान्य सातारकर करत आहेत

Adv