छ उदयनराजे यांच्या आदेशाचा उपाध्यक्ष शेंडे यांच्याकडून जिगरबाज पाठपुरावा शाहूकला मंदिराचे लोकार्पण व कमानी हौदात थुईथुई कारंजी

519
Adv

खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी मिशन शाहू कला मंदिर व कमानी हौदात थुईथुई कारंजे उडविण्याची मोहिम अखेर फत्ते केली .

शिवजयंतीच्या मुहुर्तावर शाहू कला मंदिर सुरू झाल्याने अभिनेते प्रशांत दामले व कविता लाड अभिनित एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा आनंद रसिकांनी लुटला . गुरूवार पेठेतील ऐतिहासिक कमानी हौदात स्वच्छता झाल्यानंतर पाण्याची थुईथुई उडणारी कारंजी पाहून सातारकरांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले . या दोन्ही कामांच्या पूर्णत्वात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दररोज चार तास गेल्या दहा दिवसापासून अक्षरशः गुंतवून घेतले . शाहू कला मंदिराचे नूतनीकरण गेल्या सहा महिन्यापासून रडतखडतच चालले होते खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहू कला मंदिर सुरू करण्याचे आदेश दिल्यावर उपनगराध्यक्षांनी ठेकेदार बिगारी तसेच पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली . छोटया मोठया कामांचे नियोजन ठरवत त्यांनी कामाला गती दिल्याने शाहू कला मंदिर मोठ्या दिमाखात सातारकर रसिकांच्या सेवेत रूजू झाले . उदयनराजे भोसले यांनी शाहू कला मंदिराच्या अद्ययावत सुविधांची पाहणी करून उपनगराध्यक्षांचे तत्पर कामाबद्दल विशेष कौतुक केले . त्यामुळे शुक्रवारी रात्री प्रशांत दामले यांच्या नाटकाचा रात्री चांगलाच खेळ रंगला .

ऐतिहासिक कमानी हौदाची स्वच्छता सुध्दा उपनगराध्यक्षांच्याच पुढाकाराने झाली . सलग चार तास सफाई कामगारांसमवेत उभे राहून मनोज शेंडे यांनी कमानी हौदातून दहा ट्रॅक्टर गाळ काढला . तब्बल दहा वर्ष बंद असलेले कमानी हौदाचे कारंजे पुन्हा शिवजयंतीच्या दिवशी सुरू झाले . उपनगराध्यक्षांचा कामाचा झपाटा या निमित्ताने दिसून आला . या दोन्ही कामांच्या पूर्णत्वाबद्दल सतर्क सातारकर मंचच्या वतीने मनोज शेंडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले .

Adv